-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले.
-
तरी सुद्धा अजूनही आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. या सगळ्यात आता आलिया आणि रणबीरने त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलिया आई होणार आहे.
-
सोशल मीडियावर फोटो शेअर करत आलियाने त्यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगामन होणार असल्याची माहिती दिली आहे. आलियाने तिचा आणि रणबीरचा रुगण्यालयातील फोटो शेअर केला आहे.
-
हा फोटो शेअर करत ‘आमचं बाळ लवकरच येणार आहे’, असे कॅप्शन आलियाने त्या फोटोला दिले आहे. आलियाने शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर सेलिब्रिटींनी आणि तिच्या चाहत्यांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
रणबीर आणि आलियाच्या या आनंदाच्या बातमीवर रणबीरची आई नीतू यांची काय रिअॅक्शन असेल हे सांगत, मी का थांबू मला तर लवकरात लवकर नात- नातू पाहिजे.
-
पण दुसरीकडे मीम्सचा वर्षाव झाला आहे. आलिया आणि रणबीरने ती आई होणार असल्याची बातमी शेअर केल्यानंतर रणवीर सिंगची काय रिअॅक्शन असेल हे दाखवण्यासाठी एक मजेशीर मीम शेअर केले आहे.
-
आणखी एका मीममध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजणीकांत यांचा हिला डालाना असा डायलॉग आहे. डालाना असा डायलॉग आहे.
-
आलिया आणि रणबीरच्या रुग्णालयातील फोटोत ते दोघे ही तिच्या सोनोग्राफीकडे पाहत असल्याचे दिसते. पण त्याचं मीम करताना नेटकऱ्यांनी तिथे हेरा फेरी चित्रपटातील एक सीनचा फोटो शेअर केला आहे.
-
रणबीर आणि आलियाने प्रेग्नेसी विषयी सांगितल्यानंतर तैमूरला दुख: झालं असून आता तो लाइम लाईटपासून लांब राहणार असं म्हणत असेल याचे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (All Photo Credit : Alia Bhatt Instagram and Social Media)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख