-
मराठी अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांचा आज वाढदिवस आहे.
-
अनेक मालिका, चित्रपटांतून आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते म्हणून मंगेश देसाईंकडे पाहिलं जातं.
-
विविधांगी भूमिकांमधून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
-
गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ या चित्रपटातून मंगेश देसाईंनी निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं.
-
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमुळे ‘धर्मवीर’ हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे.
-
चित्रपटाचे निर्माते असण्यासोबतच मंगेश देसाई यांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
‘धर्मवीर’मध्ये त्यांनी साकारलेली पत्रकाराची भूमिका सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता लक्षवेधी ठरत आहे.
-
अगदी काही वेळासाठी पडद्यावर दिसणाऱ्या पत्रकाराची मात्र फार मोठी भूमिका आहे.
-
या पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीनंतर ‘गद्दारांना क्षमा नाही’ असा मथळा वर्तमानपत्रात छापून आला होता.
-
यामुळे आनंद दिघे यांच्यावर खटला भरवून त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता.
-
आनंद दिघेंच्या मृत्यूवरदेखील पत्रकाराने संशय व्यक्त केल्याचे चित्रपटात दाखवले आहे.
-
आनंद दिघे यांची मुलाखत घेणारा एकमेव पत्रकार दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेनेचे खासदार आणि सामना वृत्तपत्राचे उपसंपादक संजय राऊत आहेत.
-
‘धर्मवीर’ प्रदर्शित झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्वत: याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेकदा खुलासा केला आहे.
-
“आनंद दिघेंची मुलाखत मीच घेतली होती. मी त्यांच्यासोबत सहकारी म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. त्या मुलाखतीमुळे नंतर वादळ निर्माण झालं होतं”, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
-
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या मेळाव्यातही त्यांनी पुन्हा “धर्मवीर चित्रपटातील तो पत्रकार मीच आहे”, असं म्हटलं होतं.
-
संजय राऊत आता शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार आहेत.
-
‘धर्मवीरम’ध्ये मंगेश देसाईंनी पत्रकाराची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.
-
एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील पात्रांबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
-
त्यामुळेच मंगेश देसाईंनी साकारलेला पत्रकारही सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. (सर्व फोटो : मंगेश देसाई/ फेसबुक, इंडियन एक्सप्रेस)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य