-
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सई तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे प्रकाशझोतात असते.
-
पण त्याचबरोबरीने तिच्या खासगी आयुष्यामुळे सई नेहमीच चर्चेत राहिली आहे.
-
सध्या तिचा कथित बॉयफ्रेंड अनिश जोगमुळे सोशल मीडियावर सई चर्चेचा विषय ठरली आहे.
-
सईने अनिशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबरोबर खास फोटो शेअर केला होता.
-
इतकंच नव्हे तर याआधीही तिने अनिशचा फोटो शेअर करत “मी कशाप्रकारे तुला ब्लश करायला भाग पाडते ना..!” असं म्हटलं होतं.
-
पण अनिश जोग नेमका कोण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
-
अनिश हा मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध निर्माता आहे.
-
अनिशने ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, ‘YZ’, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित