-
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.
-
अमृता यांच्या दुबई दौऱ्याचे फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लंडन दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
लंडन येथे त्यांना ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने सन्ंमानित करण्यात आलं.
-
याबाबत अमृता यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
त्या म्हणाल्या, “ब्रिटनच्या संसदेत इंडो-युके संबंधांच्या विषयावर बोलणं झालं. तसेच ब्रिटनच्या संसदेमध्ये ‘इंडियन ऑफ द वर्ल्ड’ पुरस्काराने मला सन्ंमानित करण्यात आलं.”
-
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारत-युकेमधील संबंध अधिक मजबूत झाले असल्याचंही अमृता म्हणाल्या.
-
अमृता यांनी आपल्याला पुरस्कार मिळाला असल्याचं जाहिर करताच सोशल मीडियाद्वारे त्यांचं अनेकांनी अभिनंदन केलं.
-
यावेळी त्यांनी सुंदर साडी परिधान केली होती. (फोटो – इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं