-
अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ मालिकेमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.
-
ती या मालिकेमध्ये साकारत असलेल्या संजना या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.
-
तसेच रुपालीच्या मनमोहक सौंदर्याचं चाहते सोशल मीडियाद्वारे कौतुक करताना दिसतात.
-
रुपाली आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत फोटोशूट करत असते.
-
आता देखील तिने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
-
खादी शिफॉन साडीमध्ये रुपालीचं सौंदर्य आणखीनच खुललेलं दिसत आहे.
-
इतकंच नव्हे तर रुपालीचा फिटनेस देखील या फोटोंच्यानिमित्ताने दिसून येत आहे.
-
या साडीवर इतर दागिने परिधान न करता रुपालीने चंदेरी रंगाचे कानातले घातले आहेत.
-
तसेच रुपालीने मेकअप देखील अगदी साधा केला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”