-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अमृता पवार ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ मालिकेत अदितीची भूमिका साकारून घराघरात पोहोचली.
-
मालिकेतील अदिती-सिड ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
अमृताने अल्पावधीतच अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली.
-
‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘जिगरबाज’ या मालिकांमध्येही अमृताने काम केलं आहे.
-
अमृता लवकरच विवाहबंधनात अडकून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
-
नील पाटील असं अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे.
-
अमृता-नीलचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता.
-
आता दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू आहे. नुकताच अमृता-नीलचा हळदी समारंभ पार पडला.
-
हळदीच्या रंगात रंगले अमृता-नील.
-
पिवळ्या रंगाच्या साडीत आणि फुलांच्या ज्वेलरीमुळे अमृताचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.
-
अमृताची लगीनघाई.
-
नीलनेही पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
अमृताच्या या फोटोंवर चाहते कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो : अमृता पवार, निखिल पंडित/ इन्स्टाग्राम)

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक