-
अभिनेत्री पायल रोहतगी आज तिचा बॉयफ्रेंड रेसलर विक्रम सिंहसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
-
पायल आणि विक्रम यांचा विवाहसोहळा हॉटेल जेपी पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे.
-
शुक्रवारी पायल रोहतगी आणि रेसलर विक्रम सिंह यांनी शमसाबाद मार्गावरील जुन्या राजेश्वर महादेव मंदिरात पूजा केली.
-
या पूजेचे फोटो विक्रम आणि पायल यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केले होते.
-
याशिवाय पायल रोहतगीने तिच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तिच्या मेहंदीचा कार्यक्रम ६ जुलै रोजी पार पडला आणि या कार्यक्रमात तिचा जवळचा मित्रपरिवार आणि नातेवाईक सहभागी झाले होते.
-
पायल रोहतगीच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत.
-
पायल रोहतगी आणि विक्रम सिंह यांनी सुरुवातीलाच ताजनगरी येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
-
कारण त्यांच्यामते या ठिकाणीहून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणं नेहमीच खास असेल.
-
पायल रोहतगी मागच्या काही वर्षांपासून रेसलर संग्राम सिंहला डेट करत असून आता ती अखेर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
-
पायल आणि संग्रामच्या लग्नात केवळ ५० पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे.
-
हॉटेल जेपी पॅलेसचे वॉइस प्रेसिडंट हरी सुकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेलमधील २० रुम या कुटुंबीय आणि खास मित्रपरिवाराठी बुक करण्यात आल्या आहेत. (फोटो साभार- पायल रोहतगी इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड