-
आज अभिनेत्री संगीता बिजलानी हिचा वाढदिवस.
-
संगीताने वयाची साठी ओलांडली आहे. पण तिचं सौंदर्य पाहता वय हा फक्त तिच्यासाठी आकडा असल्याचं लक्षात येतं.
-
संगीताचं संपूर्ण फिल्मी करिअर तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं.
-
वयाच्या १६व्या वर्षी तिने मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण केलं.
-
१९८८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कातिल’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
संगीताचं नाव अभिनेता सलमान खानशी जोडलं गेलं.
-
१९८६मध्ये संगीता-सलमानने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या.
-
जवळपास १० वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते.
-
त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं. इतकंच नव्हे तर लग्नपत्रिकाही छापण्यात आली. पण ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
-
सलमानने देखील त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपलं लग्न ठरलं असल्याचं सांगितलं होतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
संगीता सुप्रसिद्ध मॉडेल आहेच. पण त्याचबरोबरीने १९८०मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब देखील संगीताने पटकावला.

Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा