-
संदीप पाठक, स्पृहा जोशी, प्राजक्ता गायकवाड यांनी पांडुरंगाच्या वारीमध्ये सहभाग घेतला. आता याच कलाकारांच्या जोडीने अभिनेता स्वप्निल जोशी देखील पायवारीमध्ये सहभागी झाला होता.
-
वारकऱ्यांचा उत्साह, भक्तीमय वातावरण पाहून तो अगदी भारावून गेला.
-
स्वप्निलने पायवारी दरम्यानचा अनुभव आणि त्यादरम्यान वारकऱ्यांशी साधलेला संवाद याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
तसेच त्याने वारीदरम्यानचे फोटो देखील शेअर केले.
-
“काल वाखरी ते पंढरपूर पाई वारी चाललो. अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला काल सुरुवात झाली. कधी तरी पूर्ण वारी चालायची आहे. बघू, पांडुरंग कधी संधी देतो? पण काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही.” असं स्वप्निल म्हणाला.
-
स्वप्निलला या वारीदरम्यान त्याच्या आजीची आठवण आली.
-
तेव्हा तो म्हणाला, “माझी आजी म्हणायची, तुम्ही वारी चालला नाहीत तर तुम्ही जिवंत न्हाईत…काल मला कळलं ती असं का म्हणायची…जय हरी विठ्ठल.”
-
स्वप्निलने त्याच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत वारीमध्ये सहभाग घेतला. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक