-
सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह यांनी त्यांच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
-
पायल-संग्राम शनिवारी (९ जुलै) विवाहबंधनात अडकले. अगदी मोजक्याच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
-
आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये पायल-संग्रामने लग्न करण्याचं ठरवलं होतं.
-
ठिकाणी या सेलिब्रिटी कपलचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला.
-
पायल-संग्रामच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
-
पायल-संग्राम जवळपास १२ वर्ष एकमेकांना डेट करत होते.
-
अखेरीस दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पायलने तिच्या लग्नासाठी लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
-
तिच्या लेहेंग्यावर संपूर्ण वर्क केलेलं दिसत आहे. तर संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा घातला होता.
-
दोघांचा लूक अगदी परफेक्ट होता. तसेच पायल-संग्रामच्या लग्नाचे फोटो पाहता दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
-
पायलने डिझायनर लेहेंगा, महागडे दागिने परिधान केले होते.
-
पण तिच्या लूकची खासियत म्हणजे स्वतःच्याच लग्नात तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळाला.
-
तिच्या या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न देखील विचारले.
-
एका युजरने विचारलं की, “स्वतःच्याच लग्नात मेकअप का केला नाही?” पण पायलने स्वतःच्याच लग्नात मेकअप न करण्याचं बहुदा ठरवलं असावं.
-
(सर्व फोटो- इन्स्टाग्राम)
Video : ‘ही दोस्ती तुटायची नाय!’ लक्ष्मीकांत बेर्डेंचा आभासी फोन आला अन्…; अशोक सराफ यांच्यासह सर्वांचे डोळे पाणावले, पाहा