-
नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेते प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
प्रशांत दामले यांच्या प्रत्येक नाटकाला तर प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसतात.
-
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीचे अभिनेते म्हणून प्रशांत यांना ओळखलं जातं. पण या सुप्रसिद्ध कलाकाराचं राहणीमान अगदी साधं आहे.
-
आपल्या कुटुंबावरही त्यांचं जीवापाड प्रेम आहे.
-
प्रशांत दामले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आपल्या कुटुंबाबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रशांत यांचे नातवंड दिसत आहेत.
-
तसेच फोटो शेअर करत प्रशांत यांनी म्हटलं की, “सध्या सुट्टीवर आहे. जवळ जवळ ३ वर्षांनी आम्ही एकत्र भेटलो. एका लग्नाच्या अनेक गोष्टी असं झालंय आता.”
-
करोनाच्या काळामध्ये आपल्या मुलींशी तसेच नातवंडांशी त्यांची भेट झाली नव्हती. आता ते कुटुंबाबरोबर एण्जॉय करताना दिसले. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”