-
टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंहला ओळखले जाते.
-
भारती सिंह ही अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली.
-
त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारती सिंहने पहिल्या बाळाला जन्म दिला.
-
यानंतर तब्बल तीन महिन्यांनी भारती सिंहने तिच्या मुलाचा चेहरा दाखवला आहे.
-
नुकतंच भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या युट्यूबवर एक छान व्हिडीओ शेअर केला आहे.
-
या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही सांगितले आहे.
-
“आज तुम्ही गोला म्हणजेच माझ्या मुलाला पाहू शकणार आहात. मला याबाबत खूप मेसेज आले होते. अनेकांनी टोमणेही मारले होते. पण अखेर आज तुम्ही त्याला पाहू शकणार आहात”, असे भारतीने या व्हिडीओत म्हटले आहे.
-
“मी फार आनंदी आहे. सध्या त्याची तयारी सुरु असून त्यानंतर तुम्ही त्याला पाहू शकाल”, असेही भारतीने सांगितले.
-
यावेळी भारतीने फार मजेशीर अंदाजात तिच्या मुलाचा रुम दाखवला आहे.
-
तिच्या लेकाचा सजवलेला पाळणादेखील यात दिसत आहे.
-
तसेच त्याच्यासाठी आणलेली खेळणी, बाहुले, कपडे यांसह इतर गोष्टीही पाहायला मिळत आहे.
-
विशेष म्हणजे या व्हिडीओत भारती ही मुलाचे डायपर बदलतानाही दिसत आहे.
-
यात हर्ष आणि भारती दोघेही फारच खास पद्धतीने त्यांच्या मुलाचा चेहरा दाखवतात.
-
यासाठी त्यांनी एक मिस्ट्री बॉक्स तयार केला होता. त्या बॉक्सच्या मदतीने त्यांनी त्यांच्या लेकाचा चेहरा सर्वांना दाखवला आहे.
-
हर्ष आणि भारतीने त्यांच्या मुलाचे नाव लक्ष असे ठेवले आहे.
-
ते दोघेही प्रेमाने त्याला गोला असा आवाज देतात.
-
हर्ष आणि भारती आपल्या मुलाचे फार लाड करताना दिसत आहे.
-
विशेष म्हणजे लक्ष फार शांत आहे असेही ते यात सांगताना दिसत आहे.
-
लक्ष हा दिसायला हुबेहुब भारतीसारखा आहे. त्याचे डोळे, शरीर अगदी भारतीप्रमाणेच आहे.
-
भारती आणि हर्षने बाळाच्या जन्मानंतर खास फोटोशूटही केले होते.
-
यावेळी त्याला विविध पद्धतीने सजवण्यात आले होते.
-
सर्व फोटो – LOL (Life of Limbachiyaa’s)/ युट्यूब

Ind Vs Pak : “आता तुझी भुवई जरा…”, शुबमन गिलच्या विकेटनंतर इशारा करणाऱ्या अबरार अहमदवर टीकेचा भडीमार