-
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला ‘शाबाश मिथू’ चित्रपट १५ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
-
भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
-
या बायोपिकमध्ये तापसी मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित ‘शाबाश मिथू’ चित्रपटात मराठमोळी अभिनेत्रीदेखील झळकणार आहे.
-
अभिनेत्री तितीक्षा तावडे ‘शाबाश मिथू’ चित्रपटात तापसीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
या चित्रपटातून तितीक्षा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
-
‘शाबाश मिथू’ चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
-
विशेष म्हणजे तितीक्षाला क्रिकेट या खेळामध्ये लहानपणापासूनच रस होता. इयत्ता १०वी पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ती क्रिकेट खेळली आहे.
-
छोट्या पडद्यावरील उत्तम अभिनेत्री म्हणून तितीक्षाकडे पाहिलं जातं.
-
‘सरस्वती’, ‘कन्यादान’, ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकांमधून तितीक्षाने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
-
मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही तितीक्षाने काम केलं आहे.
-
तितीक्षा सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा चाहता वर्गही मोठा आहे.
-
छोट्या पडद्यावरून घराघरात पोहोचलेल्या तितीक्षाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
-
सध्या तितीक्षा कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (सर्व फोटो : तितीक्षा तावडे/ इन्स्टाग्राम)

Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण