-
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे.
-
सुष्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
मात्र ललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे.
-
आपल्या ट्वीटमध्ये ललित मोदी यांनी आम्ही दोघांनी लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही सध्या एकमेकांना डेट करत आहोत, अशी कबुली दिली.
-
सोशल मीडियावर सुष्मिताच्या संपत्तीविषयी चर्चा रंगू लागली आहे.
-
१९९४ मध्ये सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता.
-
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुष्मिता ७४ कोटी संपत्तीची मालकीण आहे.
-
सुष्मिताची एका महिन्याची कमाई जवळपास ६० लाख रुपये आहे.
-
सुष्मिता एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ४ कोटी रुपये घेते.
-
त्यासोबतच मॉडेलिंगचे अनेक प्रोजेक्ट्स सुष्मिता करते.
-
या व्यतिरिक्त ब्रँडचे प्रमोशन करण्यासाठी सुष्मिताला चांगलीच रक्कम दिली जाते.
-
सुष्मिता जाहिरातीत काम करत दीड कोटी रुपयांची कमाई करते.
-
२०२१ मध्ये सुष्मिताच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
-
सुष्मिता एका वर्षात ७ ते ८ कोटी रुपये कमवते.
-
सुष्मिताला लग्झरी कार फार आवडतात.
-
१९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
सुष्मिताने २००० साली रेने आणि २०१० साली अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतले.
-
सुष्मिता बऱ्याच वेळा तिच्या मुलींसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुष्मिता सेन / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : पांढऱ्या साडीत मलायका अरोराचं हॉट फोटोशूट)

VIDEO: बापरे भयंकर अपघात! वाशीमध्ये भर रस्त्यात ट्रकचा टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं; रिक्षाची अवस्था बघून घाम फुटेल