-
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तानंतर आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक ललित मोदी चर्चेत आले आहेत.
-
सुष्मितासोबतचे मालदीवमधील फोटो पोस्ट करत ललित मोदी यांनी तिचा ‘बेटर हाफ’ असा उल्लेख कॅप्शनमध्ये केला आहे.
-
सुष्मिता आणि ललित यांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगल्या असून दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मोदी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
-
ललित मोदी हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत.
-
२०१० साली आयपीएलमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.
-
तेव्हापासून ते लंडनला वास्तव्यास आहेत. त्यांना फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
-
लंडनमधील प्रसिद्ध अशा स्लोएन स्ट्रीटवर ललित मोदी यांचा पाच मजली बंगला आहे.
-
हा बंगला सात हजार चौरस फूटमध्ये पसरला आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, ललित मोदी हे ५७ कोटी डॉलर संपत्तीचे मालक आहेत.
-
भारतीय रुपयानुसार ललित मोदींची एकूण संपत्ती ४ हजार ५५५ कोटी रुपये इतकी आहे.
-
ललित मोदी लंडनमध्ये लक्झरियस आयुष्य जगतात.
-
त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या फोटोंमधूनही हे कळून येते.
-
(सर्व फोटो : ललित मोदी/ इन्स्टाग्राम)
पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल