-
गुलजार यांच्या आंधी या चित्रपटात, सुचित्रा सेनने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. खुद्द राजकारण्यांनी सुचित्रा सेन यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. हा चित्रपट इंदिरा गांधी यांच्यावर आधारीत चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट मानला जातो (फोटो: मूव्ही स्टिल)
-
अवंतिका आकेरकर यांनी बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या बहुचर्चित जीवनपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. (फोटो: मूव्ही स्टिल)
-
नरेंद्र मोदींवरील आधारीत ओमंग कुमारच्या बायोपिकमध्ये, किशोरी शहाणे यांनी इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. ही भूमिका अत्यंत छोटी असली तरी किशोरी शहाणे यांनी खूप चांगले काम केले होते. (फोटो: मूव्ही स्टिल)
-
सुप्रिया विनोद यांनी मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या राजकीय चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात नील नितीन मुकेश यांनी संजय गांधी यांची भूमिका साकारली होती. सुप्रिया विनोद यांनी NT रामाराव यांच्या जीवनावर आधारित दोन तेलुगू बायोपिकमध्येही इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.(फोटो: मूव्ही स्टिल)
-
फ्लोरा जेकबने अजय देवगणच्या थ्रिलर राइड आणि कंगना राणौत अभिनीत बायोपिक थलैवी चित्रपटात इंदिरा गांधींची भुमिका साकारली होती. (फोटो: मूव्ही स्टिल)
-
दीपा मेहता यांच्या आणीबाणीवर असलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपटात सरिता चौधरी यांनी इंदिरा यांची एक संक्षिप्त भूमिका साकारली होती. (फोटो: मूव्ही स्टिल)
-
अक्षय कुमारच्या थ्रिलर बेल बॉटम चित्रपटात लारा दत्ताने इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी लारा दत्ताने प्रचंड मेहनत घेतली होती.
-
नवनी परिहार यांनी अजय देवगणच्या भुज: द प्राईड ऑफ अ नेशन चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली होती (फोटो: मूव्ही स्टिल)
