-
आपल्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो नाही तर स्वतःचेच काही मीम्स शेअर केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.
-
प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे मीम्स शेअर केले आहेत. पहिल्या मीम्समध्ये प्राजक्ताचे साडी लूकमधील दोन फोटो पाहायला मिळत आहेत.
-
एका फोटोमध्ये साडीमधील तिचा ग्लॅमरस लूक दिसून येत आहे. त्या फोटोवर “पुण्यात असताना ती” असं लिहिलं आहे.
-
तर दुसरा फोटो गृहिणीच्या लूकमधील आहे. या फोटोवर “गावाकडे आल्यावर ती” असं लिहिलेलं दिसत आहे.
-
‘रानबाजार’ वेबसीरिज, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील प्राजक्ताच्या सुत्रसंचालनावरूनही काही धम्माल मीम्स तयार करण्यात आले आहेत.
-
प्राजक्ताने हे मीम्स शेअर करताना म्हटलं की, “खूप दिवसांनी मीम्सच्या दुनियेची सफर. मी एकटीच का? तुम्हीही आनंद घ्या…” प्राजक्ताची ही पोस्ट पाहून अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
-
एका युजरने “जाताना फरसाण घेऊन जा” असं म्हटलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
![video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/New-Project-19.jpg?w=300&h=200&crop=1)
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला