-
बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा आज ४० वा वाढदिवस. यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खास आहे कारण आज ती तिच्या लेकीसोबत सेलिब्रेशन करणार आहे.
-
हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून ग्लोबल स्टार झालेली प्रियांका फारशी बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी बऱ्याच बॉलिवूड कलाकारांसोबत तिची चांगली मैत्री आहे.
-
पण यासोबतच बॉलिवूडच्या काही लोकप्रिय कलाकारांसोबत तिचे मैत्रीपूर्ण संबंध काही काळानंतर बिघडलेले देखील आहेत.
-
बॉलिवूडमध्ये काही असे कलाकार आहेत ज्यांच्यासोबत काम करणं प्रियांका चोप्रा कटाक्षाने टाळताना दिसते किंवा हे कलाकार काही कारणाने तिच्यासोबत काम करत नाहीत.
-
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यातील वाद तर सर्वांनाच माहीत आहे. प्रियांकाने सलमान सोबत ‘मिसेस खन्ना’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. यामुळे सलमान राग आला होता.
-
त्यानंतर सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाला प्रियांकाने शेवटच्या क्षणी रामराम केल्यानंतर सलमानसोबतचे तिचे मैत्रीपूर्ण संबंध बिघडले. यावरून सलमानने तिला अनेकदा सुनावलं होतं.
-
प्रियांका चोप्रानं अभिनेता अक्षय कुमारसोबत बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. प्रियांका आणि अक्षय ही एकेकाळची गाजलेली जोडी आहे. पण नंतर यांच्या मैत्रीत दुरावा आला.
-
प्रियांका आणि अक्षय यांच्या मैत्रीत दुरावा येण्याचं कारण ट्विंकल खन्ना असल्याचं बोललं जातं. अक्षय आणि प्रियांकाचं अफेअर आहे असा संशय ट्विंकलला आल्यानंतर तिने अक्षयला प्रियांकासोबत काम न करण्याची सक्त ताकीद दिली होती.
-
प्रियांका चोप्रा आणि शाहिद कपूर यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा एकेकाळी झाल्या होत्या. पण नंतर दोघंही वेगळे झाले आणि त्यांनतर त्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केलं नाही.
-
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राने सलग दोन वर्ष एकत्र काम केले आहे. कोणत्याही अवॉर्ड शोच्या अँकरिंग असो किंवा आयपीएल मॅचेस हे दोघेही एकत्र असायचे.
-
त्यामुळे या दोघांमध्ये काही तरी सुरु आहे, अशा चर्चांना उधाण आले होते. यामुळे शाहरुखची पत्नी गौरी फार नाराज झाली आणि शाहरुखने घर जोडलेलं राहावं, यासाठी प्रियांकासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.
-
प्रियांका आणि आमिर यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात काम केलेले नाही. आमिर खान आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. मात्र त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी फार कमी अभिनेत्रींना मिळाली आहे.
-
आमिर आणि प्रियांकामध्ये काही कारणास्तव वाद असल्याचे बोललं जातं. कारण अनेकदा आमिरला तिचे नाव सुचवले असता, त्याने स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे.
-
यासोबतच प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर खान यांच्यातील वाद बराच गाजला होता. या दोघांमधील वाद अगदी करण जोहरच्या शोमध्येही समोर आले होते.
-
प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री विद्या बालन यांचं नातंही फारसं चांगलं नाही. या दोघींमध्ये वाद आहेत असं बोललं जातं. अभिनेता शाहिद कपूर या दोघींमधील वादाचं कारण असल्याच्या देखील बोललं गेलं आहे.
पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल