-
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर महाराष्ट्राला खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून विशाखा घराघरात पोहोचली.
-
काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमातून विशाखाने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
-
परंतु, आता लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विशाखा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
अप्पू आणि शशांकने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
-
संपूर्ण कानेटकर फॅमिली अपूर्वा शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत असताना आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.
-
दमयंती दुधखुळे असे या पात्राचे नाव असून ती विवाह सल्लागार असेल.
-
अभिनेत्री विशाखा सुभेदार दमयंती दुधखुळे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील या भूमिकेविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाल्या, मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक छोटासा ठिपका असेन जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे.
-
दमयंती दुधखुळे नावावरुनच ही व्यक्तिरेखा विनोदी असेल याचा अंदाज येतो.
-
अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे.
-
अप्पू-शशांकला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ती तिच्या आयुष्यातील गुंताही सोडवते.
-
त्यामुळे प्रेक्षकांना ही भूमिका नक्कीच आवडेल. (सर्व फोटो सौजन्य – विशाखा सुभेदार / इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल