-
सुश्मिता सेन बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
-
आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी सुश्मिता सोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर केल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले.
-
ललित मोदींनींच याबाबत ट्वीट करून सुश्मिताला ‘बेटर हाफ’ म्हणत दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला.
-
त्यामुळे सुश्मिताबद्दल समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.
-
१९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकून प्रसिद्धीझोतात आलेली सुश्मिता लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
‘दस्तक’ या चित्रपटातून १९९६ साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
‘बिवी नंबर १’, ‘चिंगारी’, ‘मैने प्यार क्यू किया’, ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाची छाप पाडली.
-
सुश्मिताने वयाच्या २४व्या वर्षी रेने या तिच्या पहिल्या मुलीला दत्तक घेतले.
-
नंतर २०१० साली आलिशाच्या पालकत्वाची जबाबदारी तिने स्वीकारली.
-
रेने आणि आलिशासोबतचे अनेक फोटो सुश्मिता सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
सुश्मिताची मोठी मुलगी रेने ही आता २२ वर्षांची आहे. तिलाही सुश्मिताप्रमाणेच अभिनेत्री व्हायचं आहे.
-
रेनेने ‘सट्टेबाजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.
-
सुश्मिताप्रमाणेच रेनेही ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
-
इन्स्टाग्रामवर तिचे ७५ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
-
सुश्मिताची धाकटी मुलगी आलिशा १३ वर्षांची असून तिने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
-
रेने आणि आलिशा सुश्मिताच्या जीव की प्राण आहेत.
-
अनेक मुलाखतींतही सुश्मिताने तिचं मुलींबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. (सर्व फोटो : सुश्मिता सेन, रेने सेन/ इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य