-
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे.
-
१८ जुलैला प्रियांका चोप्राने ४० वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
-
आपल्या पत्नीचा वाढदिवस निकने खूपच खास पद्धतीने साजरा केल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंमध्ये दिसून येत आहे.
-
निक जोनसने त्याच्या इन्स्टाग्रामवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या काही झलक शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये निक- प्रियांकाचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.
-
निक जोनसने प्रियांकाचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे खास आणि हटके अंदाजात साजरा केला.
-
फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस समुद्र किनाऱ्यावर एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत.
-
या फोटोंमध्ये दोघांचीही सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. प्रियांका- निकचे हे रोमँटिक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
प्रियांका चोप्राच्या बर्थ डे सेलिब्रेशचे काही हटके फोटो देखील निकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोमधील कार्डवर ‘हॅप्पी बर्थ डे प्रियांका, ८०च्या दशकातील बाळ’ असं लिहिलेलं आहे.
-
दुसऱ्या एका फोटोमध्ये निक जोनसने हातात एक टॉवेल पकडलेला दिसत आहे. ज्यावर लिहिलंय, ‘Priyanka! the jewel of july est. 1982’
-
हे फोटो शेअर करताना निकने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जुलैमधील माझ्या रत्नाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यासोबत आयुष्याचा क्रेझी प्रवास करत असल्याचा अभिमान वाटतो. खूप प्रेम प्रियांका चोप्रा.’
-
निक जोनसने पत्नी प्रियांकाचा वाढदिवस रोमँटिक अंदाजात साजरा केला असून त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. (फोटो साभार- प्रियांका चोप्रा, निक जोनस इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”