-
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. या मालिकेत तिने माया ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली.
-
रुचिरा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
-
नुकतंच रुचिराने तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेमाची कबुली दिली आहे. तिने याबाबत एक खास पोस्टही शेअर केली आहे.
-
रुचिराच्या बॉयफ्रेंडचे नाव डॉ. रोहित शिंदे असे आहे.
-
रुचिराने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना ती म्हणाली, ‘डॉ. रोहित शिंदे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जुलै महिना आपला आहे’, असे रुचिराने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
-
रुचिरा आणि रोहित गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
रुचिराच्या बहिणीच्या लग्नात त्याने हजेरी लावली होती. पण त्यावेळी रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवली होती.
-
मात्र तिने वाढदिवसाचे औचित्य साधून दोघांनी सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेम व्यक्त केलं आहे.
-
रुचिराचा बॉयफ्रेंड रोहित हा पेशाने डॉक्टर आहे.
-
पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे.
-
‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.
-
त्याने काही ब्रँडसाठी रॅम्पवॉकही केले आहे.
-
रोहितला फिटनेसची विशेष आवड आहे. त्याचे अनेक फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे रोहितला भटकंती करण्याची फार हौस आहे.
-
सर्व फोटो – रुचिरा जाधव-रोहित शिंदे/ इन्स्टाग्राम

सुवर्णसंधी; पशुधन महामंडळात मोठी भरती; दहावी उत्तीर्ण ते पदवीधर…