-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.
-
अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
गेल्या अडीच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री राधा सागर घराघरात पोहोचली.
-
या मालिकेत तिने अभिषेकच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
-
‘अंकिता’ हे खलनायिकेचं पात्र साकारून राधाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती
-
आता राधा मोठ्या पडद्यावरून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
‘भिरकीट’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात राधा ‘सुमन’ हे पात्र साकारताना दिसणार आहे.
-
चित्रपटात मुख्य नायिकाची भूमिका अभिनेता गिरिश कुलकर्णी यांनी साकारली आहे.
-
या चित्रपटातील फर्स्ट लूक राधाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
-
“नखरेल, फटाका, सुंदर, स्मार्ट, नवऱ्याला मुठीत ठेवणारी अशी ‘सुमन’ साकारताना खूप मस्त वाटलं. प्रेक्षकांना सुद्धा मला एका वेगळ्या रूपात बघायला मिळाले याचा मला मनस्वी आनंद आहे”, असं मत राधाने व्यक्त केलं आहे.
-
राधाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
राधाने याआधीही ‘विकून टाक’, ‘मलाल’, ‘ठाकरे’, ‘कंडिशन्स अप्लाय’ या चित्रपटांत काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. (सर्व फोटो : राधा सागर/ इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल