-
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
-
अदाचे अनेक ग्लॅमरस फोटो व्हायरल होताना दिसतात.
-
अदाने नुकतेच एक हटके फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो अदाने इन्स्टाग्राम अकाऊंवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अदाने पानाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
अदाच्या हॉट लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
स्टाईलमुळे चर्चेत राहणाऱ्या अदाला भाजी विकताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु नंतर हे फोटोशूट असल्याचे कळले.
-
विशेष म्हणजे भाजी विकतानाचा फोटो अनेकांच्या पसंतीत उतरत आहे.
-
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटोशूट अदासाठी खास असून एका हॉलिवूड चित्रपटासाठी लागणाऱ्या लूक टेस्टसाठी ते करण्यात आले आहे.
-
त्यामुळे अदा आता हॉलिवूडची वाट धरते का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
-
अदाने २००८ साली ‘१९२०’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
‘१९२०’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अदाने ‘हंसी तो फसी’, ‘कमांडो ३’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
सध्या अदा एका शॉर्ट फिल्म आणि तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – अदा शर्मा / इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”