-
मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
आयरानं बॉयफ्रेण्ड नुपूर शिखरे आणि आजी जीनत हुसैन यांच्या भेटीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
आयराच्या या फोटोंमुळे ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करून ‘लग्न करणार आहेस का?’ असा प्रश्नदेखील विचारला आहे.
-
आयरा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ६२ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
-
बॉयफ्रेण्ड नुपूरसोबतचे अनेक फोटो ती शेअर करत असते.
-
आयरा आणि नुपूर गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
गेल्याच वर्षी त्यांनी आपल्या नात्याबद्दल कबुली दिली होती.
-
नुपूर शिखरे हा एक फिटनेस ट्रेनर आहे.
-
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं होतं.
-
त्यावेळी नुपूर शिखरे आयराचा फिटनेस ट्रेनर होता.
-
आमिर खानचाही नुपूर फिटनेस ट्रेनर राहिला आहे, अशी माहिती आहे.
-
नुपूर शिखरे आणि आयरा खानचा रोमॅंटिक फोटो.
-
आयराच्या पोस्टमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. (सर्व फोटो : आयरा खान,नुपूर शिखरे/ इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल