-
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले ‘राणादा’, ‘पाठक बाई’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे.
-
‘फाईल नंबर – ४९८ अ’ या चित्रपटात हे दोघे महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
-
आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत मल्हार गणेश दिग्दर्शित ‘फाईल नंबर ४९८ अ’ या चित्रपटाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिली आहे.
-
कायद्यातील ‘४९८ अ’ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
-
अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले होते.
-
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्राने भरभरून प्रेम केले आहे.
-
या मालिकेनंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे.
-
त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते.
-
हार्दिक, अक्षयाने पुन्हा एकत्र काम करण्याची चाहत्यांची इच्छा ‘फाईल नंबर ४९८ अ’ या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे.
-
या चित्रपटात हार्दिक आणि अक्षया प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील.
-
नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटातून हार्दिक आणि अक्षया पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र येणार असल्याने या चित्रपटाविषयीचे कुतूहल अधिकच वाढले आहे हे नक्की.
-
श्रीधर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे.
-
संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचे आहे.
-
स्वप्नील- प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – हार्दिक जोशी, अक्षया देवधर / इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं