-
अभिनयासोबतच सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर.
-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराणी सोयराबाईंची भूमिका साकारून स्नेहलता घराघरात पोहोचली.
-
स्नेहलता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच स्नेहलताने नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये स्नेहलताने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
हटके पोझमध्ये केलेलं हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
फोटोमधील स्नेहलताचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक झाले आहेत.
-
स्नेहलताचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
मराठीसोबतच स्नेहलताने हिंदी मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. (सर्व फोटो : स्नेहलता वसईकर/ इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल