-
आज ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होणार आहे.
-
कलाविश्वातील दिग्गज कलाकार मंडळींना या मानाच्या पुरस्काराने आजवर गौरवण्यात आलं आहे.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी आजवर तब्बल ५ राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ‘अंकुर’, ‘अर्थ’, ‘खंडहर’, ‘पार’ आणि ‘गॉडमदर’ या चित्रपटांसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले.
-
शबाना आझमी यांच्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे अभिनेते ठरले.
-
अमिताभ यांच्या नावे आतापर्यंत ४ राष्ट्रीय पुरस्कार आहेत. ‘अग्निपथ’, ‘ब्लॅक’, ‘पा’ आणि ‘पीकू’ चित्रपटांसाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
-
अभिनेत्री कंगना रणौतला देखील आजवर ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
-
‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘मणिकर्णिका’ चित्रपटांसाठी तिला हा पुरस्कार मिळाला.
-
त्याचबरोबरीने तब्बल ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे.
-
कमल हसन, नाना पाटेकर, पंकज कपूर, नसीरुद्दीन शहा यांसारख्या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. (फोटो – सर्व फाईल फोटो)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य