-
मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली.
-
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
-
या पुरस्कारांमध्ये यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाने पटकावला.
-
दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला.
-
तसेच ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी गायक राहुल देशपांडे यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार पटकावला.
-
त्याचबरोबरीने ‘मी वसंतराव’ चित्रपटातील ध्वनीसंयोजनासाठी अनमोल भावे यांना पुरस्कार जाहीर झाला.
-
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने पटकावला.
-
अभिनेता अजय देवगणला ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहिर करण्यात आला.
-
उल्लेखनीय फिचर फिल्ममध्येही मराठी चित्रपटांनी बाजी मारली.
-
जून, गोदाकाठ, अवांछित या मराठी चित्रपटांना उल्लेखनीय फिचर फिल्म पुरस्कार जाहीर झाला.
-
अजय देवगणच्या ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
-
यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनीही आपलं स्थान कायम राखलं आहे.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे