-
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (२३ जुलै) दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे करण्यात आली.
-
करोनामुळे गेले दोन वर्षे मनोरंजन उद्योगाचे चक्र एकूणच थंडावले होते.
-
त्यामुळे यंदा २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
-
चित्रपटांवर आधारित लेखनासाठीही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात.
-
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून यंदा शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाची निवड करण्यात आली.
-
सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य.
-
आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येण्या आधीच यंदाच्या मनाच्या समजल्या जाणाऱ्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाने पटकावला आहे.
-
या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
-
आयुष्य जगत असताना प्रत्येक जण काही ना काही स्वप्न उराशी बाळगून असतात. यात काही स्वप्न ही साधी सोपी असतात, तर काही स्वप्नं ही कठीण परीक्षा घेणारे असतात.
-
त्यामुळे काहींची स्वप्न सहज पूर्ण होतात. तर काहींना मात्र प्रचंड कष्ट करावे लागतात, यात अनेकांची ही स्वप्न ही अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात.
-
पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा.. अशाच एका तरुणीच्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणी’ची या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.
-
या चित्रपटाचा टीझर २०२० साली प्रदर्शित झाला आहे.
-
पैठणी हा प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो.
-
त्यामुळे आपल्याकडे एकतरी पैठणी असावी असं प्रत्येकीला वाटतं. असंच एक स्वप्न, इच्छा या चित्रपटातील अभिनेत्रीची आहे.
-
त्यामुळे प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ती तिची लहानशी स्वप्न व्यक्त करताना दिसून येत आहे.
-
शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
-
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
-
अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
-
आशा निराशेने सजलेला स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो जणू एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव / इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं