-
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड.
-
कार्तिकीच्या आजवरच्या यशात तिच्या आई वडिलांचा मोठा हात आहेच मात्र तिच्या भावाचाही यात मोलाचा वाटा आहे. नुकतंच कार्तिकीने तिच्या लहान भावाचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
-
कार्तिकीचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाड हा देखील तिच्याप्रमाणे उत्कृष्ट गायक आहे.
-
नुकतंच कार्तिकीने इन्स्टाग्रामवर तिच्या लहान भावाचे अभिनंदन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
-
कौस्तुभने त्यांचे वडील गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना मर्सिडीज गाडी भेट म्हणून दिली आहे.
-
कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत कौस्तुभ हा एका फॉर्मवर सही करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
त्यानंतर त्याचे वडील हे गाडीच्या शो रुममध्ये येतात. त्यानंतर मुलाने भेट म्हणून दिलेली मर्सिडीज गाडी पाहून ते क्षणभर थक्क होतात.
-
“वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना Mercedes भेट दिली. खूप खूप शुभेच्छा” असं कार्तिकीने म्हटलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा – Photos : रणवीर सिंग पाठोपाठ न्यूड लूकमधील बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो ठरताहेत चर्चेचा विषय)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO