-
मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अभिनेता प्रसाद ओकचं नाव आदराने घेतलं जातं.
-
प्रसादने फक्त अभिनयक्षेत्रातच नव्हे तर दिग्दर्शन क्षेत्रातही स्वतःला सिद्ध केलं.
-
दिग्दर्शक म्हणून प्रसादची एक वेगळी ओळख आहे.
-
चंद्रमुखी, हिरकणी सारखे त्याने दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट सुपरहिट ठरले.
-
पण प्रसादचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला कलाक्षेत्रामध्ये नाव कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
-
मराठी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामध्ये प्रसादने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले.
-
तो म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा मी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. पेईंग गेस्टचे पैसे मला भरता आले नाही म्हणून त्यावेळी मला तिथून बाहेर काढण्यात आलं.”
-
“चित्रा चित्रपटगृहाच्या बाहेरील दुकानाच्या फळीवर मी झोपायचो. चित्रपटगृहाबाहेरील रस्त्यावर किंवा फळीवर मला झोपायला लागतंय यापेक्षा त्याच चित्रपटगृहामध्ये माझं पोस्टर कधी लागेल हा विचार माझ्या मनात यायचा.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन