-
अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kpoor) बहुचर्चित ‘शमशेरा’ (Shamshera) चित्रपट प्रदर्शित झाला.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालणार असं बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही.
-
‘शमशेरा’ला बॉक्स ऑफिसवर काहीसा थंड प्रतिसाद मिळाला.
-
‘शमशेरा’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १० कोटी रुपये कमाई केली.
-
ही कमाई इतर सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेत फारच कमी आहे. विकेण्डला हा चित्रपट तुफान चालणार असा अंदाज होता.
-
मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. शनिवारी (२३ जुलै) देखील चित्रपटाने फक्त ९ ते १० कोटी रुपयांच्या घरात बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावला.
-
तर रविवारी (२४ जुलै) या चित्रपटाने फक्त ११ कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली.
-
आतापर्यंत या चित्रपटाने ४० कोटी रुपयांचा टप्पा देखील गाठला नाही.
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन