-
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमातून अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे.
-
या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध महिला व्यक्तिमत्व उपस्थित राहणार असून सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे.
-
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुबोध सोबत साधलेला हा खास संवाद…
-
१. या कार्यक्रमाबद्दल तुला विचारणा झाली तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती?
– मला काहीतरी वेगळं किंवा नवीन करायची इच्छा होती. संगीत किंवा नृत्यांच्या स्पर्धांमध्ये आत एकसुरीपणा यायला लागला आहे. -
मी याआधी अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे पण संवादाचा कार्यक्रम मी कधीच केला नव्हता आणि तो करायची माझी खूप इच्छा होती.
-
त्यामुळे जेव्हा मला वाहिनीने या कार्यक्रमाची संकल्पना सांगितली तेव्हा मला ती खूप आवडली आणि त्वरित होकार दिला.
-
२. या कार्यक्रमात तुझी भूमिका काय आहे?
– या कार्यक्रमात एक महिला मंडळ असणार आहे जे आलेल्या पाहुण्या कलाकारांना थेट प्रश्न विचारणार आहे. -
त्यामुळे या कार्यक्रमात मी पाहुणे कलाकार आणि महिला मंडळ यांच्या मधला दुआ आहे.
-
मूळ कार्यक्रम मुख्यत्वे पाहुणे कलाकार आणि महिला मंडळाचा आहे.
-
त्यामुळे पाहुणे कलाकारांनी जास्तीत जास्त बोलावं आणि महिला मंडळाने जास्तीत जास्त प्रश्न विचारावे हीच या कार्यक्रमाची अपेक्षा आहे.
-
पण तो संवाद मुद्द्यावर येतोय ना? वेळेत सगळं संवाद होतोय ना? पाहुणे कलाकारांना काही गोष्टी नीट व्यक्त कराव्याशा वाटतात पण त्यासाठी योग्य मंच मिळत नाही तर त्या नीट व्यक्त होत आहेत ना? हे सगळं पाहण्याची जबाबदारी माझी आहे.
-
३. शूटिंग दरम्यानचा काही किस्सा?
– अमृता फडणवीस जेव्हा मंचावर आल्या होत्या तेव्हा महिला मंडळाने त्यांना ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारला त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं यासाठी प्रेक्षकांनी तो भाग न चुकता बघावा पण त्यांचं उत्तर ऐकून मी थक्क झालो आणि माझा त्यांच्याबद्दलचा आदर वाढला. -
‘बस बाई बस’ हा कार्यक्रम २९ जुलै पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुबोध भावे / इन्स्टाग्राम)

“माझ्या दोन्ही मुलांना हृदयविकार, उपचाराकरता आम्हाला भारतात राहू द्या”, पाकिस्तानी नागरिकाची भारताला विनंती!