-
अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते.
-
बिग बॉस ओटीटीनंतर दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची कबुलीही दिली होती. पण आता राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांचा ब्रेकअप झाला आहे.
-
राकेश- शमिताचं बिनसल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या. आता दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ब्रेकअप झाल्याची माहिती दिली आहे.
-
शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याची सुरुवात ‘बिग बॉस ओटीटी’पासून झाली होती. बिग बॉसच्या घरातच त्या दोघांची पहिली भेट झाली होती.
-
या संपूर्ण शोध्ये राकेश आणि शमिता एकमेकांची काळजी घेताना आणि एकमेकांना मानसिक आधार देताना दिसले होते.
-
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही अनेकदा विविध कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये दोघांनीही एकत्र हजेरी लावली होती.
-
शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात असताना राकेशनं तिला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. एवढंच नाही तर त्याने सोशल मीडियावरूनही तिला पाठिंबा दिला होता.
-
काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण सुरु असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. पण आता त्यांनी एकमेकांपासून वेगळं झाल्याची घोषणा केली आहे.
-
राकेश बापटने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत म्हटले की, “मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे की, शमिता आणि मी आता एकत्र नाही. नशिबाने आम्हाला एका वेगळ्या मार्गावर आणून सोडले आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि पाठिंबा याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
-
“मला आम्ही वेगळे झाल्याची बातमी अशाप्रकारे जाहीर करायची नव्हती. पण माझ्या चाहत्यांना याबाबतची माहिती द्यावी, असे मला वाटले. आशा आहे की, आम्ही वेगळे झाल्यानंतरही तुम्ही आमच्यावर पूर्वीप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करत राहाल.” असंही तो म्हणाला आहे.
-
तर शमितानेही तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं, “मी आणि राकेश आता रिलेशनशिपमध्ये नाहीत, हे जाहीररित्या स्पष्ट करणं फार गरजेचे आहे. गेल्या काही काळापासून आम्ही एकत्र राहत नाही.”
-
तिने पुढे लिहिलं, “आमचा हा म्युझिक व्हिडीओ आमच्या चाहत्यांसाठी आहे, जे आमच्यावर खूप प्रेम करतात. तुमच्या प्रेमाचा वर्षाव आमच्यावर असाच करत राहा.” (फोटो- सोशल मीडिया)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…