-
‘झी मराठी’वर लवकरच ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमाची थीम महिलांवर आधारित आहे.
-
वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
-
येत्या २९ जुलैपासून हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.
-
त्यांनी सुबोध भावेसोबत, राजकारणासह इतर वेगवेगळ्या विषयांवर धम्माल गप्पा मारल्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी विविध गोष्टींवर भाष्य केले आहे.
-
या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवण्यात आला.
-
यावेळी सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींशी गुजराती भाषेत संवाद साधला. याचा व्हिडीओ झी मराठीने शेअर केला आहे.
-
“नमस्कार मोदीजी कसे आहात तुम्ही…..मी गुजरातला जाऊन आले. तिथे सगळं ठिक आहे. गुजरात खूप सुंदर आहे”, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
-
“तिथे मला दर्शनाबेन भेटल्या. त्यांनी मला सुरतला गेल्यावर फाफडाही खायला दिला”, असेही त्या म्हणाल्या.
-
“मी सुरतलाही गेले होते. तिकडे काही आमदारही होते. ते रेडिसन्स हॉटेलमध्ये थांबलेत याची मला काही माहितीच नव्हती”, असेही त्यांनी म्हटले.
-
“अमित शाह पण तिथे होते. ते रोज संसदेत येतात. ते मस्त भाषण करतात. पण तुम्ही संसदेत येत नाहीत”, अशी खंतही सुप्रिया सुळेंनी सांगितली.
-
“तुम्ही या ना, फार छान वाटेल आम्हा सर्वांना. तुम्ही या आणि माझं भाषण ऐका, मला फार आवडेल”, असेही त्या म्हणाल्या.
-
“मी गुजराती भाषा बोलायला थोडं थोडं शिकत आहे. मी थोडं गुजराती, थोडं मराठीत बोलते”, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
-
“गुजरातचे आणि महाराष्ट्राचे संबंध मोरारजी भाईंच्या काळापासून चांगले आहेत”, असेही त्यांनी मोदींना सांगितले.
-
“आपली पहिली भेट झाली तेव्हा तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री होता. तेव्हा मी, तुम्ही आणि अनुराग ठाकूर आपण मॅच पाहायला गेलो होतो”, अशी आठवणही त्यांनी यानिमित्ताने सांगितली.
-
“तुम्ही या पुन्हा आपण मॅच पाहायला जाऊ, फार मजा येईल”, असेही त्या म्हणाल्या.
-
“तुम्ही पंतप्रधान आहात, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे मला कल्पना आहे. चला मी निघते”, अशाप्रकारे सुप्रिया सुळेंनी मोदींसोबत संवाद साधला.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”