-
‘भाभीजी घर पर है’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे.
-
शुभांगीने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘दो हंसो का जोडा’, ‘कस्तुरी’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील तिने साकरलेली अंगूरी भाभी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
मालिकेत सालस, निरागस आणि भोळ्या भाबड्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
शुभांगीने लाल रंगाची साडी नेसून फोटोशूट केलं आहे.
-
तिच्या साडीतील कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
‘अंगूरी भाभी’चं बोल्ड फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
‘अंगूरी भाभी’ या भूमिकेमुळे शुभांगी लोकप्रिय झाली.
-
दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
-
शुभांगी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ती बोल्ड फोटो शेअर करत असते. (सर्व फोटो : शुभांगी अत्रे / इन्स्टाग्राम)
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?