-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.
-
‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो.
-
बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात झाला होता.
-
त्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचे नावाची चर्चा सुरु आहे.
-
नुकतंच त्या स्पर्धकाचे नाव समोर आलं आहे.
-
प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच हार्दिक जोशी हा बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे.
-
हार्दिक जोशीला बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याने याबाबत काहीही उत्तर दिलेले नाही.
-
हार्दिक हा सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे.
-
पण लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
त्यामुळे हार्दिक जोशी हा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका संपल्यानंतर हार्दिक हा बिग बॉस मराठी शो बद्दल विचार करु शकतो, असे बोललं जात आहे.
-
त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “हार्दिकने बिग बॉसमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.”
-
मात्र अद्याप त्याने यासाठी होकार दिलेला नाही.
-
दरम्यान ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
-
साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले होते.
-
यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला होतो.
-
याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होतो.
-
त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं होते.
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”