-
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि कॉमेडी शोबद्दल बोलायचे तर, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोचे नाव त्यात नक्कीच घेतले जाते. (Photo : @tarak_mehta_clips)
-
त्यातील जवळपास सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून यातील एक पात्र म्हणजे अभिनेता मंदार चांदवडकर यांनी साकारलेली आत्माराम तुकाराम भिडे. (Mandar Chandwadkar)
-
तारक मेहता का उल्टा चष्मा या शोला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. (Photo : @mmoonstar)
-
यावेळी आत्माराम तुकाराम भिडे, म्हणजेच अभिनेता मंदार चांदवडकर यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणती रिस्क घेतली हे सांगितले आहे. (Mandar Chandwadkar)
-
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मंदारने सांगितले की, ते दुबईस्थित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर होते आणि त्यांना चांगली नोकरी होती. (Mandar Chandwadkar)
-
पण त्यांना अभिनयाची आवड होती आणि त्यातच करिअर करायचे होते, म्हणून त्याने नोकरी सोडण्याचा धोका पत्करला. (Mandar Chandwadkar)
-
२००० साली ते दुबईतून नोकरी सोडून भारतात परतले. (Mandar Chandwadkar)
-
यानंतर त्यांनी अभिनयात हात आजमावला पण २००८ पर्यंत त्यांना विशेष काम मिळू शकले नाही. (Mandar Chandwadkar)
-
८ वर्षांच्या संघर्षानंतर, २००८ मध्ये, जेव्हा त्यांना तारक मेहता का उल्टा चष्मा या शोबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यासाठी ऑडिशन दिले आणि ऑडिशनमध्ये त्यांची निवड झाली. (Mandar Chandwadkar)
-
मंदार म्हणाले की, इथूनच मला काम मिळू लागलं आणि माझी ओळख भिडे अशी झाली. (Mandar Chandwadkar)
-
ते सांगतात, आजही माझी लाँड्री बिले माझ्या खऱ्या नावावर नसून भिडेच्या नावाने येतात. (Mandar Chandwadkar)
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा