-
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये चर्चेत आहे.
-
‘पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
-
अनेकांनी रणवीरच्या या फोटोशूटचं कौतुक केलं तर काहींनी त्यावर टीकाही केली. एवढंच नाही तर न्यूड फोटोशूट केल्यामुळे त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली.
-
आपल्या हटके स्टाइलमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा रणवीर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
-
न्यूड फोटोशूटनंतर पुन्हा एकदा रणवीर प्रकाशझोतात आला आहे.
-
रणवीरने दीपिकासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
‘मिजवान फॅशन शो’मध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सहभागी झाले होते.
-
या फॅशन शो दरम्यानच्या रणवीर-दीपिकाच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
‘मिजवान फॅशन शो’साठी रणवीर-दीपिकाने खास मनिष मल्होत्राने डिझाइन केलेले ड्रेस परिधान केले होते.
-
रणवीरने काळ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी सूट परिधान केला होता. तर दीपिका भरजरी लेहेंग्यात दिसून आली.
-
‘मिजवान फॅशन शो’मधील रणवीर-दीपिकाचा रॅम्प वॉकचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
रणवीर-दीपिका ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
रणवीर-दीपिकाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, मनिष मल्होत्रा/ इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कुठल्या महिन्यापासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही…”