-
लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी कासार सध्या ‘सुख म्हणजे नक्की असते’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
या मालिकेत ती मानसीची भूमिका साकारत आहे.
-
अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने श्रावण स्पेशल फोटोशूट केलं आहे.
-
फोटोशूटसाठी अश्विनीने खास जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
-
साजेसा मेकअप आणि केसांत गजरा माळून पारंपारिक लूक केला होता.
-
फोटोसाठी विविध पोझही अश्विनीने दिल्या आहेत.
-
श्रावण महिन्यातील निसर्गाप्रमाणेच अश्विनीचं सौंदर्यही खुलून दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
अश्विनीने ‘सावित्रीज्योती’, ‘मोलकरीण बाई’, ‘कमला’ अशा मालिकांमधून दमदार भूमिका साकारून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
-
अनेकदा अश्विनी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो : अश्विनी कासार/ इन्स्टाग्राम)

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल