-
छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं.
-
‘बिग बॉस’च्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो.
-
या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र आता चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन ते करणार नसल्याचे बोललं जात आहे.
-
‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार? याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे.
-
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेते नाना पाटेकर यांना या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनासाठी विचारण्यात आलं होतं.
-
पण काही कारणास्तव त्यांनी हा कार्यक्रम करण्यास नकार दिला.
-
सध्यातरी या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन कोण करणार? हे ठरलेलं नाही.
-
अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाचं सुत्रसंचालन करणार असल्याचं बोललं जात आहे. (फोटो – सर्व फाईल फोटो)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य