-
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्गज अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. बुधवारी (३ ऑगस्ट) मिथिलेश चतुर्वेदी यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
गेल्या अनेक दिवसांपासून मिथिलेश हे हृदयरोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
-
मिथिलेश चतुर्वेदी यांनी १९९७ मध्ये ‘भाई भाई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकले.
-
यात ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
-
मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानंतर ‘क्रेझी 4’ आणि ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जयदीप सेन यांनी ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना भावूक प्रतिक्रिया दिली.
-
जयदीप सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता.
-
त्यामुळे ते काही दिवस लखनऊला त्यांच्या मूळ गावी गेले होते. मात्र ३ ऑगस्टला त्यांचे निधन झाले.
-
“मिथिलेश चतुर्वेदींसोबत माझे खूप जवळचे नाते होते. मला त्यांच्यासोबत ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रेझी 4’ या चित्रपटात काम करण्याचे भाग्य मिळाले.” असे जयदीप सेन म्हणाले.
-
“क्रेझी 4′ हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. पण जेव्हा आपण एखाद्याला इतके जवळून ओळखतो, त्यांच्यासोबत काम करतो.”
-
“यात त्यांनी त्यांची कौशल्य दाखवली. पण जेव्हा अशी चांगली माणसे जग सोडून जातात तेव्हा खूप त्रास होतो”, असे दिग्दर्शक जयदीप सेन यांनी म्हटले.
-
यावेळी जयदीप सेन यांनी ‘कोई मिल गया’ चित्रपटात मिथिलेश चतुर्वेंदीना कशाप्रकारे कास्ट करण्यात आलं, याबद्दल त्यांनी खुलासा केला.
-
या चित्रपटामुळे माझे आणि मिथिलेश चतुर्वेदींसोबत नाते खूप घट्ट झाले होते.
-
मिथिलेश चतुर्वेदी यांची ‘कोई मिल गया’ या चित्रपटासाठी निवड अतिशय मनोरंजक पद्धतीने झाली होती.
-
बॉलिवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांनी मिथिलेश यांचा ‘फिजा’ हा चित्रपट पाहिला होता. या चित्रपटातील एक दृश्य राकेश रोशन यांना फार आवडले होते.
-
यात करिश्मा कपूर ही रागात मिथिलेश यांच्या तोंडावर पाणी फेकते, असे यात दाखवण्यात आले होते.
-
हे दृश्य पाहून राकेश रोशन यांना त्यांचा अभिनय फार आवडला होता. त्यानंतर राकेश रोशन यांनी तो अभिनेता कोण असे अनेकांना विचारले होते.
-
त्यानंतर आमच्यातील एका कलाकाराने त्यांचे नाव मिथिलेश चतुर्वेदी आहे असे सांगितले होते. यानंतर त्यांना ‘कोई मिल गया’ या चित्रपटासाठी साइन करण्यात आले होते.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…