-
झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला या सहभागी होतात.
-
अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे.
-
सुबोध आणि इतर कलाकार मिळून शोमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना बोलतं करतात.
-
नुकतंच या शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.
-
या शोमधील काही व्हिडीओ क्लिप्स झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.
-
अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. अनेकदा एखाद्या विषयावरील आपलं मत त्या परखडपणे व्यक्त करताना दिसतात.
-
अमृता या गायिकाही आहेत. त्यांनी गायलेली अनेक गाणी हिटही ठरली आहेत.
-
‘बस बाई बस’ शोमध्ये अमृता यांना विचारण्यात आलेल्या सर्वच प्रश्नांची त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
-
या शोमध्ये त्यांना “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना माननीय मुख्यमंत्री म्हणून मामू म्हणायचे. पण, तुम्हाला मात्र लोक मामी म्हणतात. तर हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं?”, असा प्रश्न विचारण्यात आला.
-
यावर त्यांनी अगदी हसत मजेशीर उत्तर दिले.
-
“लोक मला मामी म्हणतात हे ऐकून फारच मजा येते”, असं अमृता म्हणाल्या.
-
‘बस बाई बस’ शोमधील अमृता यांच्या व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
अमृता यांना या शोमध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो : अमृता फडणवीस, झी मराठी/ इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं