-
‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.
-
‘बस बाई बस’मधील अमृता यांचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
हे प्रोमो पाहिल्यानंतर या भागामध्ये त्या राजकीय परिस्थिती तसेच आपल्या खासगी आयुष्याबाबत भाष्य करताना दिसणार असल्याचं लक्षात येतं.
-
अमृता यांच्या लूकबाबत अनेकदा बोललं जातं. याबाबतच या कार्यक्रमामध्ये त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला.
-
“तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” हा प्रश्न अमृता यांना विचारताच त्या म्हणाल्या, “चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला. याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलं आहे. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते.”
-
“याचा आणखी एक तोटा म्हणजे एकदा का चेहरा बिघडला की भविष्यकाळात तुम्हाला अडचण निर्माण होते. एक सांगते मी लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील जायचे नाही. “
-
“त्यानंतरही लग्नामध्ये मेकअप करतात तोच मी केला होता. देवेंद्रजी पण असे आहेत की ते स्त्रीचा चेहरा नव्हे तर मन पाहतात.” (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं