-
मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये शरद पोंक्षे यांचं नाव आदराने घेतलं जातं.
-
कर्करोगासारख्या आजारावर यशस्वीरित्या मात करत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमध्ये ते सध्या काम करत आहेत.
-
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शरद पोंक्षे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत.
-
त्यांनी चक्क खास फोटोशूट केलं आहे.
-
निळ्या रंगाचं शर्ट आणि पँट त्यांनी परिधान करत हे फोटोशूट केलं.
-
त्यांचा हा नवा लूक पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. “या वयातही खूपच तरुण दिसत आहात”, “अतिसुंदर” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
वयाच्या ५५व्या वर्षीही त्यांचा हा नवा लूक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल