-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
-
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा विवाहबंधनात अडकली. तिने तिचा पती कुणाल बेनोडेकर पुन्हा लगीनगाठ बांधली.
-
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली-कुणाल पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकले.
-
लग्नाला दोन महिने उलटल्यानंतर तिने तिच्या लग्नाचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
सोनाली ही सोशल मीडियावर फार सक्रीय असते. नुकतंच सोनाली कुलकर्णीने एक पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये तिने तिच्या लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत.
-
यातील एका फोटोत कुणालने सोनालीचा हात हातात घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत सोनाली ही सप्तपदी चालताना दिसत आहे.
-
या फोटोत सोनाली आणि कुणाल या दोघांचे चेहरे दिसत नाही.
-
पण त्यांचे हे फोटो पाहून सोनाली-कुणालचे लग्न पारंपारिक पद्धतीने पार पडल्याचे दिसत आहे.
-
यावेळी सोनालीने छान हिरव्या रंगाची पैठणी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.
-
विशेष म्हणजे तिने हातावर आणि पायावर अगदी नववधूप्रमाणे छान मेहंदही काढली आहे.
-
तर दुसरीकडे कुणालने छान धोती परिधान केली आहे.
-
“07.05.2022. ते. 11.08.2022…, राखून ठेवलेले हे क्षण, साठवून ठेवायला फक्त ६ दिवस बाकी”, असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
-
या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाइक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यावर अनेकांनी कमेंट करत तिला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख