-
झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत असून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या महिला यात सहभागी होतात.
-
इतर कलाकार आणि सुबोध भावे मिळून कार्यक्रमात हजेरी लावलेल्या महिलेला प्रश्न विचारून बोलतं करतात.
-
या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.
-
अमृता फडणवीस या गायिका आहेत. त्यांची अनेक गाणी हिट ठरली आहेत.
-
कार्यक्रमात विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना अमृता फडणवीस यांनी अगदी दिलखुलासपणे आणि मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली.
-
‘बस बाई बस’ शोमधील एका खेळात अमृता फडणवीसांना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा फोटो दाखवण्यात आला.
-
शोमधील या खेळात फोटोतील व्यक्ती आपला सहप्रवासी आहे, असं समजून प्रवासादरम्यान त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात.
-
रश्मी ठाकरे या सहप्रवासी आहेत हे कळल्यावर अमृता यांनी त्यांना “ कशा आहात? सगळं ठीक आहे ना?”, असं विचारलं.
-
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या रश्मी ठाकरे संपादिका होत्या. त्यामुळे अमृता यांनी “सामना छान रंगवत आहात”, असा टोला लगावला.
-
पुढे त्या म्हणाल्या,” तुम्ही ज्याप्रकारे घर सांभाळत आहात, त्याबद्दल मला आदर वाटतो. त्यातून मला खूप शिकायलाही मिळतं”.
-
“बाकी चढ-उतार सुरुच राहतात. पण, आपण नेहमीच मैत्रिणी राहू”, असंही अमृता म्हणाल्या.
-
‘बस बाई बस’ कार्यक्रमातील व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्याने अमृता सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
-
(सर्व फोटो : झी मराठी, अमृता फडणवीस/ इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं