-
झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, दुसऱ्या भागात अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी झाल्या होत्या.
-
त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजेरी लावली.
-
नुकतंच झी मराठीवर हा भाग प्रसारित झाला. यावेळी विविध गंमतीजमती पाहायला मिळाल्या.
-
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात विविध उलथापालथ पाहायला मिळाली.
-
राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
-
बस बाई बस या कार्यक्रमात विविध राजकीय घटनांवर अमृता फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आले.
-
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत असे वाटतं का? असा प्रश्न अमृता फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अगदी मुद्देसूदपणे उत्तर दिलं
-
“देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री असावेत असे मला कधीच वाटले नाही”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
-
“जेव्हा एकनाथ शिंदेंचे नाव पुढे आले तेव्हापासून मला कधीच वाटले नाही की देवेंद्रजी हेच मुख्यमंत्री असावेत.”
-
“पण कदाचित वाटू शकलं असतं जर इतर कोणाचं नाव पुढे आलं असतं. तर असे मला नक्कीच वाटलं असते”, असेही त्यांनी सांगितले.
-
त्यासोबत त्यांनी वर्षा बंगल्याची फारच आठवण येते, असेही म्हटले.
-
सर्व फोटो – अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?