-
‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
या कार्यक्रमामच्या पुढील भागामध्ये अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी मेधा मांजरेकर हजेरी लावणार आहेत.
-
याचे काही प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या प्रोमोमध्ये मेधा यांना अश्रू अनावर झाले असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
या कार्यक्रमामध्ये मेधा यांना त्यांत्या आई-बाबांचा फोटो दाखवण्यात आला.
-
आई-बाबांचा फोटो पाहून त्यांना डोळ्यात लगेचच पाणी आलं.
-
मेधा म्हणाल्या, “हे माझे आई-बाबा आहेत. एका वर्षापूर्वी दोघांचंही नऊ महिन्यांच्या अंतराने निधन झालं.”
-
हे सांगताना मेधा अगदी भावूक झाल्या होत्या. त्यांचं आपल्या आई-वडिलांवर किती प्रेम होतं हे हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल